भुजबळ आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक विषयी

भुजबळ आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक विषयी

भुजबळ आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक हे नाशिक शहराच्या निमाणी बस स्टॅन्ड समोर, मध्यवर्ती भागात असून कोणत्याही रुग्णास येण्या जाण्यास सोयीचे आहे.

भुजबळ आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक मध्ये आम्ही गेल्या २० वर्षांपासून रुग्णांना यशस्वीरित्या शुद्ध आयुर्वेद पंचकर्म चिकित्सा करित आहोत, क्लिनिक मध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या व्यक्तिगत शारीरिक, मानसिक तक्रारी समजून घेऊन त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने आयुर्वेदिक उपचार केले जातात. आजच्या धावपळीच्या आणि चुकीच्या जीवनशैली मुळे (lifestyle disorders), व्यायामाच्या अभावामुळे, चुकीचा आहार-विहार पद्धतीमुळे आपण स्वतःहून अनेक आजारांना आमंत्रण देत आहोत .

सततच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे जुनाट झालेल्या आजारांना पंचकर्म म्हणजेच स्नेहन, स्वेदन, वमन , विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण, कटिबस्ती, शिरोधारा, अग्निकर्म यांसारख्या शास्त्रोक्त पंचकर्म उपचारांनी व आयुर्वेदिक औषोधोपचारांनी व्याधीमुक्त करण्याचे ठिकाण (उपचार केंद्र) म्हणजे भुजबळ आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक होय .

डॉ अरुण सुभाष भुजबळ

- एम. डी. (आयुर्वेद वाचस्पती) विद्यापीठातून प्रथम क्रमांक सुवर्णपदकासह २००५ मध्ये उत्तीर्ण.
- बी. ए. एम. एस. - पुणे विद्यापीठातून द्वितीय क्रमांकाने २००२ मध्ये उत्तीर्ण.
- हृदयरोग परिसंवाद पुणे येथे राज्यस्तरीय शोध प्रबंधास प्रथम क्रमांक.
- पुणे येथे 'युवाभूषण' पुरस्कार प्राप्त.
- श्री सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालय येथे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्य केले.
- आयुर्वेदातील अनेक दिग्गज ऋषितुल्य व्यक्तिमत्व गुरु म्हणून लाभले.
- पुणे, मुंबई, धुळे, अकोला, दौंड, येथे CMO म्हणून कार्य केले.
- दैनिक सकाळ, दिव्यमराठी, लोकमत, गावकरी इ. दैनिकामधून आरोग्यविषयक विपुल लेख.
- सोरायसिस, लठ्ठपणा, संधिवात, पंचकर्म कुणासाठी ? या विषयांवर पुस्तकांचेे लेखन.
- नाशिकसह अनेक शहरांमध्ये मोफत तपासणी शिबिरांद्वारे रुग्णसेवा.
- सुमारे २५ वर्षांचा यशस्वी आयुर्वेद चिकीत्सेचा अनुभव.
- हजारोंच्या संख्येने पंचकर्म - वमन विरेचनादी, यशस्वीरित्या करित आहेत.
- असंख्य रुग्णांची सेवा करतांना अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य, धन्वंतरी कृपेने केले आणि करित आहेत.
- श्री. अंजनेय आयुर्वेद महाविद्यालय, नाशिक येथे प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून कार्यरत.

डॉ. सौ. ज्ञानदा भुजबळ

- बी. ए. एम. एस. प्रथम श्रेणीत २००३ मध्ये उत्तीर्ण.
- आयुर्वेदीय आहार शास्त्र तज्ञ पदवी २००४ मध्ये प्राप्त.
- योग तज्ञ पदवी २००५ मध्ये प्राप्त.
- संस्कृत विषयात २०१२ मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त.
- पुणे, हडपसर, जोशी पंचकर्म हॉस्पिटल मध्ये CMO म्हणून कार्य केले.
- श्री सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालय येथे प्राद्यापक म्हणून कार्यरत.
- आहार आयुर्वेद या विषयावर अनेक व्याख्यानांचे आयोजन.
- सुमारे २५ वर्षांपासून यशस्वी आयुर्वेद चिकीत्सेचा अनुभव.

थोडं आयुर्वेदाविषयी...

आयुर्वेद - आयुष्याचा वेद - म्हणजेच निरोगी आयुष्य मिळविण्यासाठी काय करावे, काय करू नये हे सांगणारे शास्त्र. आयुर्वेद शास्त्राचा मुख्य हेतु स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य रक्षण करणे होय. म्हणूनच आयुर्वेदात दिनचर्या म्हणजेच अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करावे ? काय करू नये ? रात्रीचर्या तसेच ऋतुचर्या म्हणजे त्या त्या ऋतूत काय करावे , काय करू नये या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. म्हणूनच आयुर्वेद शास्त्रतील सांगितलेल्या नियमांचे पालन केल्यास आपले स्वास्थ्य निरोगी रहाते. आणि एखादा आजार झालाच तर तो पंचकर्म , आयुर्वेदिक औषधी , आहार इत्यादींच्या सहाय्याने तो समूळ काढण्याचे मार्गदर्शन आयुर्वेद शास्त्रात केलेले आहे.

आयुर्वेदामधे उपचार हे मुख्यतः दोन प्रकारे केले जातात .
१. शोधन कर्म - पंचकर्म व उप कर्मांच्या सहाय्याने शरीरांची शुद्धी करणे.
२. शमन कर्म - यात आयुर्वेदिक औषधी उपचार जसे गोळ्या , चूर्ण , काढे , तेल , तूप , इत्यादींच्या सहाय्याने आजार कमी किंवा नाहिसा केला जातो.

शोधन -वाढलेल्या दोषांना (वात, पित्त, कफ) शरीराबाहेर काढणे म्हणजे शोधन होय. साध्या भाषेत शरीराची सर्व्हिसिंग करणे होय (Body detoxification). यामध्ये आजार औषध देऊन शरीरातच जिरून न टाकता तो आजार शरीरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न कला जातो. यामुळे आजार समूळ नष्ट होतो व तो सहसा होत नाही. जुनाट व काही असाध्य व्याधींमध्ये औषधींनी विशेष फरक पडत नाही अशा व्याधींमध्ये पंचकर्माने लवकर व चांगला फरक पडू शकतो.

पंचकर्मांमध्ये खालील 5 कर्मांचा अंतर्भाव होतो.
१. वमन
२. विरेचन
३. बस्ती
४. रक्तमोक्षण
५. नस्य

हे पंचकर्म करण्यापूर्वी स्नेहन म्हणजे संपूर्ण शरीराला मालिश ( मसाज ) करणे व स्वेदन म्हणजे सर्व शरीराला वाफ ( steam ) हे कर्म केले जातात. प्रत्येक पेशंटला हे पाचही पंचकर्म केलेच पाहिजे असे आवश्यक नाही तर पेशंटची प्रकृती, वय, ऋतू, जुना आजार या सर्वांचा सारासार विचार करून वैद्य पेशंटला कुठला उपचार घ्यायचा हे ठरवितात. वात, पित्त व कफ यापैकी एखादाही दोष वाढलेला किंवा कमी झालेला असल्यास शरीरात आजार किंवा रोग निर्माण होत असतात .

पंचकर्म करताना त्या पेशंटची शक्ती पहिली जाते तसेच रुग्णांची उपचार स्विकारण्याची शारीरिक क्षमता तपासली जाते व वैद्यांना योग्य वाटले तरच पाचन औषधे आधी देऊन स्नेहन, स्वेदन ही पूर्वकर्म केले जातात.

व्याधी

  खालील व्याधींमध्ये आयुर्वेदिक उपचार अत्यंत यशस्वी झालेत.
- स्त्रीरोग PCOD पाळीला खूप जाणे, पांढरे जाणे, अजिबात न जाणे वेदना, इ. पाळीच्या तक्रारी.
- मेदरोग ( लट्टपणा ) .
- त्वचारिया - सोरियसिस, मुखदूषिका, यकृतवीकार.
- संधिवात - मणक्याचे विकार - पाठदुखी; हाडांचे आजार, टाच दुखी, अस्थिक्षय - केसांचे विकार.
- वात - पित्त - कफाचे विकार.
- कफ , दमा , जुनाट सर्दी चे विकार .
- हृदयरोग , मुतखडा.
- मुळव्याध , फिशर , फिस्च्युला .
- लाहान मुलांचे आजार - उंची न वाढणे , मान न धरणे , मंदबुद्धी , सतत आजारी असणे
- पोटाचे आजार , यकृत विकार , IBS
- संपूर्ण ९ महिन्यांची गर्भिणी परिचर्या

Hi Bhujbal Ayurved Panchakarma Clinic