वाढते प्रदूषण, प्रचंड वृक्षतोड, मोठ्या संख्येने वाढणारी सिमेंटची जंगले यामुळे आयुर्वेदिक वनस्पतीचा मोठ्या प्रमाणात ह्रास होत आहे. तसेच वाढत्या स्पर्धेमुळे अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनेच औषधी कंपन्यांना औषधी निर्माण करणे जमेलच असे नाही. त्यामुळे वैद्यकीय शास्रात सगळ्यात मोठे शस्त्र- आयुध- औषध - या औषध रुपी शस्त्राचीच धार बोथट झालेली बऱ्याचदा दिसते .
आणि म्हणूनच रुग्णांना चांगल्या प्रतीची औषधें मिळण्यासाठी आम्ही स्वतः औषधें निर्माण करतो . आमच्या नवीन वैद्य विद्यार्थ्यांनाही स्वतःच औषधें निर्माण करण्याचे मार्गदर्शन केले जाते .