पंचकर्म ही आयुर्वेदिक चिकित्सा

पंचकर्माविषयी

पंचकर्म - शरीर शुद्धीचा राजमार्ग

सद्याची जीवनशैली, अयोग्य आहार-विहार, वाढते प्रदूषण, जीवघेणी स्पर्धा इत्यादींचा आपल्या शरीर व मनावर अयोग्य परिणाम होऊन, आपल्या शरीरात दोष साठतात. त्यामुळे आपल्याला मोठमोठया आजारांना सामोरे जावे लागते. पंचकर्म हे अशा दूषित दोषांना बाहेर काढतातच शिवाय महत्वाचे म्हणजे दोषांचा समतोल साधण्याचे कार्य ही करतात. म्हणूनच फक्त आजारी व्यक्तनीच नाही तर निरोगी व्यक्तींनीदेखील पंचकर्म करावेत.

पंचकर्म किती व कोणते ?
वमन, विरेचन, नस्य, बस्ती, रक्तमोक्षण हि पाच मुख्य पंचकर्म होत. पंचकर्म करित असताना दोष सहज सुटे-मोकळे होण्यासाठी पंचकर्म करण्यापूर्वी संपूर्ण शरीरास औषधी तेलाने मालीश (स्नेहन) व औषधी काढ्याची वाफ देणे (स्वेदन) करतात. शरीरात आतून चिकटून बसलेले दोष मोकळे होण्यासाठी मालीश (स्नेहन) व वाफ (स्वेदन) देणे आवश्यक असते.

पंचकर्म कोणी करावे ?
आयुर्वेदात सांगितले आहे "स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं आतुरस्य विकार प्रशमनश्च" स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य रक्षणासाठी आणि व्याधी असणाऱ्या व्यक्तींनी , व्याधी शमनासाठी पंचकर्म करावेत. स्वस्थ व्यक्तींनी स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी त्या त्या ऋतूत सांगितलेले पंचकर्म करावेत.जसे वसंत ऋतुत ( फेब्रु-मार्च) वमन कर्म ,शरद ऋतुत(सप्टेंबर-ऑक्टोबर) विरेचन कर्म - रक्तमोक्षण वर्षा (जून-जुलै ) बस्ती हि पंचकर्म फिटनेस साठी केली जातात .

image

आता एक एक पंचकर्माची माहिती पाहू

कोणतेही पंचकर्म करण्यापूर्वी संपूर्ण शरीरास औषधी तेलाने मालीश (स्वेदन) आणि औषधी काढ्याची वाफ (स्नेहन) करणे अत्यंत आवश्यक असते . यामुळे शरीरात पसरलेले दोष कोठ्यात येण्यास मदत होते .

१) वमन

यामध्ये ४- ७ दिवस आतून व बाहेरून स्नेहन, स्वेदन करून औषधी उलटीद्वारे दोष शरीराबाहेर काढले जातात . हे पंचकर्म विशेषतः कफाचे आजार , लठ्ठपणा, दमा , त्वचाविकार , स्त्रियांचे पाळीचे आजार इत्यादी व्याधींमध्ये केले जातात.

२)विरेचन

यामध्ये ४-७ दिवस आतून व बाहेरून स्नेहन, स्वेदन करून जुलाबावाटे वाढलेले दोष शरीराबाहेर काढले जातात . पित्ताचे विकार ,पित्ताशयात खडे होणे ,जुनाट आम्लपित्त , लठ्ठपणा ,वंध्यत्व ,पाळीच्या तक्रारी ,त्वचा विकार अशा अनेक व्याधींमध्ये विरेचनाचा चांगला फायदा होतो .
वमन व विरेचनानंतर विशिष्ट प्रकारचा आहार घ्यावा लागतो .

३)बस्ती

बस्ती हे पंचकर्म अत्यंत महत्वाचे असून त्यास अर्धचिकित्सा म्हटले जाते. यामध्ये औषधी काढे ,औषधी तेल गुदद्वारावाटे सोडेल जातात. वाताचे सगळे विकार,संधिवात ,आमवात ,लठ्ठपणा,पाळीच्या तक्रारी ,वंध्यत्व ,त्वचाविकार,अशा वेगवगळ्या व्याधींसाठी वेगवेगळे बस्ती उपचार करता येतात, ते वैद्यांच्या सल्यानुसार ठरविता येते .

४)नस्य

म्हणजेच नाकात औषधी तेल-तूप-चूर्ण सोडणे होय . विशेषतः खांद्यापासून वरील भागाच्या अवयवयांना ताकद देण्याचे काम नस्य या पंचकर्मामुळे होते . म्हणूनच नेत्र विकार ,मानेचे विकार ,डोकेदुखी,केसांच्या तक्रारी यांसाठी नस्याचा चांगला फायदा होतो.

५)रक्तमोक्षण

म्हणजेच दूषित रक्त शरीराबाहेर काढून टाकणे होय, हे वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते . जळवा लावणे (Leech therapy), सिरांद्वारे रक्त काढणे ,अलाबू लावणे इत्यादी विविध पद्धतीने कुठल्या आजारावर रक्तमोक्षण करावयाचे आहे त्यानुसार ठरविले जाते . सोरायसिस ,पांढरे कोड ,मुखदूषिका (pimples) आदी आजारांवर चांगला फायदा होताना दिसतो

अशा प्रकारे मुख्य पाच पंचकर्मे असून विविध प्रकारची उपकर्मे सांगितली आहेत.

१. मन्या बस्ती
२. कटी बस्ती
३. हृदय बस्ती
४. नाभी बस्ती
५. पृष्ठ बस्ती
६. तर्पण
७. शिरोधारा
८. उत्तर बस्ती
९. पिंड स्वेद - स्थानिक, सर्वांग.

Hi Bhujbal Ayurved Panchakarma Clinic
Whatsapp