तुमचे आता वय होत चालले आहे, हे सांगणारा आजार म्हणजे संधिवात. पूर्वी सत्तरीनंतर हा आजार दिसायचा. परंतु सद्या अगदी तीस, चाळीशी मध्येच दिसायला लागला आहे. ऋतू बदलला की सांधे दुखणे, चालताना सांधे कट- कट वाजणे, सांध्यांना सूज येणे, रोजच्या हालचाली करणे त्रासदायक होणे .औषधोपचार, पथ्य आणि योग्य ती पंचकर्म केल्यास संधिवातामध्ये रुग्णांना चांगला अराम मिळतो. तसेच ऑपरेशन सुद्धा टाळता येते